Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, “मी ते वतन सोडवू शकत नाही; कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड होईल; तर माझा सोडवण्याचा हक्क तू घे, कारण मला ते सोडवता येत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा तो जवळचा नातलग म्हणाला, “माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही; सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 यावरून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य म्हणाला, “असे असेल, तर मग मी ती सोडवू शकत नाही. कारण त्यामुळे माझी स्वतःची मालमत्ता धोक्यात येईल. तू स्वतःच ती सोडवून घे. मी हे करू शकत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 4:6
8 Iomraidhean Croise  

मग यहूदा ओनान ह्याला म्हणाला, “आपल्या भावजयीपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालव.”


तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला, तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आप्ताने पुढे येऊन आपल्या भाऊबंदाने विकलेला भाग सोडवून घ्यावा.


आपल्या भावजयीला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली तर तिने गावच्या वेशीत वडीलवर्गाकडे जाऊन म्हणावे की, ‘माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्राएलात ठेवायला कबूल नाही आणि माझ्याशी दिराच्या कर्तव्याला अनुसरून वागायची त्याची इच्छा नाही.’


मग त्याच्या नगरातल्या वडीलवर्गाने त्याला बोलावून आणून त्याच्याशी बोलणे करावे; तो आपलाच हेका चालवून म्हणाला की, ‘हिला बायको करून घेण्याची माझी इच्छा नाही,’


तर त्याच्या भावजयीने वडीलवर्गादेखत त्याच्याजवळ येऊन त्याच्या पायातले पायतण काढावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, ‘जो कोणी आपल्या भावाचे घराणे चालवत नाही त्याचे असेच करावे.’


नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही तो त्याचे कल्याण करो.” नामी तिला आणखी म्हणाली, “हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्याला हक्क आहे.”


तू रात्रभर येथे राहा, आणि सकाळी तो तुझ्यासंबंधाने आप्तकर्तव्य करायला तयार झाला तर बरेच; त्याला ते करू दे; पण तुझ्यासंबंधाने आप्तकर्तव्य करायला तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी ते करीन. सकाळपर्यंत निजून राहा.”


तेव्हा तो तिला म्हणाला, “तू कोण आहेस?” ती म्हणाली, “मी आपली दासी रूथ आहे; ह्या आपल्या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या; कारण आमचे वतन सोडवण्याचा हक्क आपल्याला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan