Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत, ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणार्‍या राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी ख्याती होवो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 4:11
24 Iomraidhean Croise  

एफ्रोन हित्ती हा हेथींमध्ये बसलेला होता. तो हेथींच्या समक्ष, त्याच्या गावच्या वेशीतून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांसमक्ष अब्राहामाला म्हणाला,


त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, “बाई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैर्‍यांच्या नगरांची सत्ता पावो.”


लाबानास दोन मुली होत्या; वडील मुलीचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल.


सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेआ; मग तो लाबानास म्हणाला, “आपण माझ्याशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?”


लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.”


लेआ हिचे मुलगे : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.


राहेलीचे मुलगे : योसेफ व बन्यामीन.


मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली; आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली.


सल्मा हा बेथेलहेमाचा बाप; हारेफ हा बेथगादेराचा बाप.


पाहा, एफ्राथात आम्ही कोशाविषयी ऐकले; तो वैराण प्रदेशात आम्हांला सापडला.


प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.


तिचा पती वेशीत देशाच्या वडीलमंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो.


मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व साक्षी बोलावून त्याला पैसा तागडीने तोलून दिला.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


‘हे यहूदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”’


आपल्या भावजयीला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली तर तिने गावच्या वेशीत वडीलवर्गाकडे जाऊन म्हणावे की, ‘माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्राएलात ठेवायला कबूल नाही आणि माझ्याशी दिराच्या कर्तव्याला अनुसरून वागायची त्याची इच्छा नाही.’


तर त्याच्या भावजयीने वडीलवर्गादेखत त्याच्याजवळ येऊन त्याच्या पायातले पायतण काढावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, ‘जो कोणी आपल्या भावाचे घराणे चालवत नाही त्याचे असेच करावे.’


त्या पुरुषाचे नाव अलीमलेख व त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्यांच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती; हे एफ्राथी म्हणजे बेथलेहेम-यहूदा येथील रहिवासी होते; ते मवाब देशात जाऊन राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan