Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्या दरम्यान बवाज नगराच्या वेशीकडे गेला आणि तो तिथे बसला असताना तो सोडवणूक करणारा, ज्याच्याबद्दल त्याने सांगितले होते, तो मनुष्य पुढे आला. तेव्हा बवाज त्याला म्हणाला, “माझ्या मित्रा, इकडे ये आणि इथे बस.” तेव्हा तो तिकडे गेला आणि बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 4:1
21 Iomraidhean Croise  

मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता; त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला; आणि भूमीपर्यंत तोंड लववून त्याने त्यांना नमन केले;


एफ्रोन हित्ती हा हेथींमध्ये बसलेला होता. तो हेथींच्या समक्ष, त्याच्या गावच्या वेशीतून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांसमक्ष अब्राहामाला म्हणाला,


त्यावर हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांनी आपल्या नगराच्या वेशीकडे जाऊन नगरवासी लोकांशी असे बोलणे लावले की,


अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणार्‍या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून “तू कोणत्या नगराचा आहेस,” असे विचारी; तेव्हा तो म्हणे, “तुझा दास इस्राएलाच्या अमुक अमुक वंशातला आहे.”


इस्राएलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते, आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते.


मी नगराच्या वेशीनजीक जाऊन, चौकात माझे आसन मांडी,


वेशीवर कोणी आपल्या पक्षाचा आहे हे पाहून मी पोरक्यावर आपला हात उचलला असला;


वेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात, मी मद्यपी लोकांच्या गीतांचा विषय झालो.


तिचा पती वेशीत देशाच्या वडीलमंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो.


“अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैशावाचून व मोलावाचून द्राक्षा-रसाचा व दुधाचा सौदा करा!


मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व साक्षी बोलावून त्याला पैसा तागडीने तोलून दिला.


वाइटाचा द्वेष करा, बर्‍याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा; परमेश्वर, सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील.


अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो; मी तर तुम्हांला आकाशातील चार्‍ही वार्‍यांप्रमाणे चोहोकडे विखरले आहे, असे परमेश्वर म्हणतो.


तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे तू न्यायाधीश व अंमलदार नेमावेस; त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.


तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर.


तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडीलवर्गासमोर न्यावे.


आपल्या भावजयीला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली तर तिने गावच्या वेशीत वडीलवर्गाकडे जाऊन म्हणावे की, ‘माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्राएलात ठेवायला कबूल नाही आणि माझ्याशी दिराच्या कर्तव्याला अनुसरून वागायची त्याची इच्छा नाही.’


असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकिकत सांगावी; मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहायला जागा द्यावी.


मी तुझे वतन सोडवण्याजोगा जवळचा आप्त आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक आप्त आहे.


ती म्हणाली, “मुली, ह्या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो ते समजेपर्यंत तू स्वस्थ राहा; कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहायचा नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan