Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 खाणेपिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेशी निजला; मग ती गुपचूप जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 खाणेपिणे झाल्यावर त्याचे मन प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या बाजूला झोपला. मग ती गुपचूप जाऊन बवाजाच्या पायावरचे पांघरूण काढून तेथे झोपली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा बवाजने खाणे आणि पिणे संपविले आणि तो आनंदात होता, मग तो झोपण्यासाठी धान्य रचून ठेवलेल्या ढिगाऱ्यांच्या शेवटी गेला. रूथ शांतपणे त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या पायांवरचे पांघरूण काढले आणि तिथेच पडून राहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 3:7
18 Iomraidhean Croise  

मग योसेफापुढची पक्वान्ने त्यांना नेऊन वाढली, पण बन्यामिनाला इतरांच्या पाचपट वाढले, आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले.


अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की, “सावध राहा, अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हांला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा, काही भिऊ नका; मी तुम्हांला हुकूम करतो आहे ना? हिंमत धरा, शौर्य दाखवा.”


त्याची बायको ईजबेल त्याला म्हणाली, “सांप्रत इस्राएलावर तुमची राजसत्ता आहे ना! चला, उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा; इज्रेलकर नाबोथाचा द्राक्षमळा मी तुम्हांला मिळवून देते.”


सातव्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्लासयुक्त झाले असता त्याने महूमान, बिगथा, हरबोना, बिग्था, अवगथा, जेरथ, कर्खस असे जे सात खोजे त्याच्या तैनातीस असत त्यांना आज्ञा केली की,


म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी.


ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करतात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्वकाही साध्य होते.


मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले.


मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.


जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.


म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.


द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा;


ते आनंदाच्या भरात म्हणाले, “शमशोनाला समोर आणा म्हणजे तो आपली करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबांमध्ये उभे केले.


ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हातार्‍या घरमालकाला ते म्हणू लागले, “तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याला जाणू.”


मग त्या दोघांनी बसून न्याहारी केली. मग मुलीचा बाप जावयाला म्हणाला, “कृपया आज खुशीने येथे राहा आणि आणखी एक रात्र मजेत घालवा.”


मग जावई आपली उपपत्नी व सेवक ह्यांच्यासह जायला निघाला, तेव्हा मुलीचा बाप म्हणजे त्याचा सासरा त्याला म्हणाला, “संध्याकाळ होत चालली आहे तुम्ही कृपया रात्री येथेच राहा. दिवस सरत आला आहे; येथेच आनंदात राहा. उद्या सकाळी पहाटेस उठून मार्गस्थ व्हा व आपल्या घरी जा.”


तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले.


मध्यरात्र उलटल्यावर तो माणूस दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तर आपल्या पायांजवळ कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan