Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 3:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ती त्याच्या पायाशी पहाट होईपर्यंत निजून राहिली, आणि मनुष्य मनुष्याला ओळखता येण्यापूर्वी ती उठली; कारण बवाजने तिला सांगितले होते की, “खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ती त्याच्या पायाशी झोपून राहिली आणि मग मनुष्य मनुष्यास ओळखेल इतके उजाडेल त्याच्या अगोदर उठली, कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 म्हणून ती सकाळपर्यंत त्याच्या पायाजवळ पडून राहिली, परंतु इतर कोणालाही कळण्याआधी ती उठून बसली, तेव्हा तो म्हणाला, “कोणालाही हे माहीत व्हायला नको की एक स्त्री या खळ्यात आली होती.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 3:14
8 Iomraidhean Croise  

सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.


वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.


म्हणून तुम्हांला जे उत्तम लाभले आहे त्याची निंदा होऊ नये.


यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका;


कारण आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य’, इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.


वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


तो तिला म्हणाला, “तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर.” तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मापून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले; मग ती गावात गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan