रूथ 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचलास? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले; ती म्हणाली, “ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचला? आणि हे काम कोठे केलेस? ज्याने तुला मदत केली, त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात आज काम केले ते तिने सासूला सांगितले. ती म्हणाली, “ज्याच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तिच्या सासूने तिला विचारले, “धान्य गोळा करण्यासाठी आज तू कुठे गेली होतीस? तू कुठे काम केलेस? ज्याने तुझी एवढी काळजी घेतली, तो मनुष्य आशीर्वादित असो!” तेव्हा रूथने तिच्या सासूला त्याच्याबद्दल सांगितले ज्याच्या ठिकाणी ती काम करीत होती. ती म्हणाली, “ज्या माणसाबरोबर मी आज काम केले त्याचे नाव बवाज असे आहे,” Faic an caibideil |