Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. ज्याच्या पंखाचा आश्रय करावयास तू आली आहेस तो इस्राएलाचा देव परमेश्वर तुला पुरे पारितोषिक देवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 2:12
29 Iomraidhean Croise  

मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव,


शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते.


हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते!


हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करतो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.


तेव्हा माणसे म्हणतील की, “नीतिमानास खचीत फलप्राप्ती होते, खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”


तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन. (सेला)


कारण तू माझे साहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन.


तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.


दुर्जन वेतन मिळवतो ते बेभरवशाचे असते; परंतु जो नीतीचे बीजारोपण करतो त्याचे वेतन खातरीचे असते.


कारण पारितोषिक निश्‍चये मिळणार; तुझी आशा नष्ट होणार नाही.


परमेश्वर असे म्हणतो, “तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर; कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल; ते शत्रूंच्या देशांतून परत येतील, असे परमेश्वर म्हणतो.


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.


माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.


तुम्ही तर आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे.


लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणार्‍या, स्वत:ला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणार्‍या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणार्‍या कोणा माणसाला तुम्हांला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.


(प्रभू करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो!) आणि इफिसात कितीतरी प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल.


‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.


आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव;


बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस ही सविस्तर हकिकत मला समजली आहे.


ती म्हणाली, “महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्यावी; मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”


हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा होवो; कारण तुझी सून जी तुझ्यावर प्रीती करते व जी तुला सात पुत्रांहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे.”


कोणाच्या तावडीत त्याचा शत्रू सापडला तर तो त्याला सहीसलामत जाऊ देईल काय? म्हणून आज तू जे वर्तन माझ्याशी केले आहेस त्याबद्दल परमेश्वर तुझे बरे करो.


पाहा, मला हे ठाऊक आहे की तू खात्रीने राजा होणार आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती कायम राहणार.


Lean sinn:

Sanasan


Sanasan