Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, “माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतलात ह्याचे काय कारण बरे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, “मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यावर तिने तिचे मुख जमिनीकडे खाली लवून ते मान्य केले. ती त्याला म्हणाली, “मी एक परदेशी असूनही तुम्ही माझ्यावर एवढी कृपादृष्टी का बरे दाखवित आहात?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 2:10
19 Iomraidhean Croise  

त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्‍याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले;


माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्‍यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?”


मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, “हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणावेस?”


तो प्रणाम करून म्हणाला, “आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?”


तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वत:सारखी प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले,


माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून?


कारण ‘त्याने’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील!


बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.


बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस ही सविस्तर हकिकत मला समजली आहे.


ती म्हणाली, “महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्यावी; मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”


तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचलास? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले; ती म्हणाली, “ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज.”


मवाबी रूथ नामीस म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचत जाईन; ती म्हणाली, “मुली जा.


हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा; तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी ह्या गड्यांना दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्यांकडे जाऊन ह्या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी.”


अबीगईल दाविदाला पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan