Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोन्ही सुनांसह परत जाण्यास ती निघाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परमेश्वराने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जायला निघाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जेव्हा नाओमीने ऐकले की, याहवेह मोआब येथे त्यांच्या लोकांच्या मदतीला आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी अन्नाचा पुरवठा केला आहे, तेव्हा तिने आणि तिच्या सुनांनी त्यांच्या घराकडे परत जाण्याची तयारी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 1:6
27 Iomraidhean Croise  

ह्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले.


याकोबाने असा नवस केला की, “देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिच्यात माझे संरक्षण करील आणि मला खायला अन्न व ल्यायला वस्त्र देईल,


त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहाम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले,


मग योसेफाने इस्राएल वंशजांना शपथ घालून म्हटले, “देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा.”


तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत तिची धूळधाण पाहून ते हळहळतात.


त्याने आपले भय धरणार्‍यांना अन्न दिले आहे; तो आपला करार सदा स्मरतो.


मी तिला विपुल अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करीन.


सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस.


तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो; भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.


तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो; उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो;


तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे;


तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.


व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे.


पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्‍यास बीज, खाणार्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत,


परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांला ह्या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन.


परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले : “पाहा, मी तुम्हांला धान्य, नवा द्राक्षारस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल; ह्यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हांला निंदास्पद करणार नाही.


तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्‍हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.


आमची रोजची भाकर आज आम्हांला दे;


“इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे;


तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”


आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले; ह्याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती ह्यांना अंतरली.


ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती तेथून निघून यहूदा देशास जायला मार्गस्थ झाली.


आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला तीन पुत्र व दोन कन्या झाल्या. इकडे शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan