Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग पुन्हा त्या गळा काढून रडू लागल्या; अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला; पण रूथ तिला बिलगून राहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग तिच्या सुना मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले, पण रूथ तिच्या जवळ राहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 1:14
22 Iomraidhean Croise  

तू मला आपल्या मुलाबाळांचे चुंबन घेण्याचीही सवड दिली नाहीस; हा सर्व तू मूर्खपणा केलास.


लाबान मोठ्या पहाटेस उठला, त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला.


मग सारे लोक यार्देनेपलीकडे गेले; राजाही पलीकडे गेला; राजाने बर्जिल्लयाचे चुंबन घेऊन त्याचे अभीष्ट चिंतले; आणि तो स्वस्थानी परत गेला.


तेव्हा तो बैल सोडून एलीयाच्या मागून धावला; तो त्याला म्हणाला, “मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन येऊ द्या; मग मी आपला अनुयायी होईन.” तो त्याला म्हणाला, “परत जा, मी तुझे काय केले?”


मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.


जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणार्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुमच्याबरोबर येतो, कारण देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”’


जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही;


मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.


पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती.


तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला; त्यांत दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.


आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात.


कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला.


परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकी’ आहोत.


तरी ते प्रौढ होतील तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवर्‍यांवाचून राहाल काय? छे, छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे; परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे.”


तेव्हा ती म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.”


ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती तेथून निघून यहूदा देशास जायला मार्गस्थ झाली.


बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस ही सविस्तर हकिकत मला समजली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan