Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 9:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्यामागे लागले. ‘अडवणुकीच्या धोंड्यावर’ ते ठेचाळले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने मिळेल म्हणून ते त्याच्यामागे लागले. ते अडखळविणार्‍या धोंड्याला अडखळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 9:32
15 Iomraidhean Croise  

म्हणजे तो तुम्हांला पवित्रस्थान होईल; तथापि इस्राएलाच्या उभय घराण्यांत तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल.


त्यांपैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्नभिन्न होतील, पाशांत अडकून धरले जातील.”


असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर ह्यांत मात्र सन्मान मिळत नाही.”


शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे;


जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”


कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत.


तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ‘ईर्ष्या निर्माण होण्यासाठी’ त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे.


ह्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे; अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा पिता जो अब्राहाम त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून जे चालतात, त्यांनाही निश्‍चित व्हावे.


आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा,


कारण असा शास्त्रलेख आहे : “पाहा, निवडलेली, मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनेत बसवतो; तिच्यावर विश्वास ठेवणारा फजीत होणार नाही.”


आणि “ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला;” ते वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan