Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे, हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी माझ्या बंधूंसाठी जे शारीरिक रीतीने माझे स्वजातीय आहेत, त्यांच्यासाठी शापित होऊन ख्रिस्तापासून वेगळे होऊ शकलो असतो तर बरे झाले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 9:3
27 Iomraidhean Croise  

तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “होय, तू खरोखर माझ्या हाडामांसाचा आहेस.” याकोब त्याच्याकडे महिनाभर राहिला.


तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्‍गार काढले; “माझ्या पुत्रा अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा : तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरेरे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!!”


माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गणगोताचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू?”


तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर म आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.”


अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणार्‍यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे.


त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेमेत शासन करण्यास आणावे.


त्यांनी त्याला म्हटले की, ‘आपल्यासंबंधाने यहूदीयाहून आम्हांला काही पत्रे आली नाहीत, किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणाविषयी काही प्रतिकूल बातमी आणली नाही अथवा काही सांगितले नाही;


तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला,


तर मी विचारतो, ‘देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?’ कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे.


ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे.


माझा नातेवाईक हेरोदियोन ह्याला सलाम सांगा. नार्किससच्या घरातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना सलाम सांगा.


माझा सहकारी तीमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.


माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा; ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते.


मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत.


म्हणून मी तुम्हांला कळवतो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस “येशू शापित आहे”3 असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू हा प्रभू आहे” असे म्हणता येत नाही.


जर कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. माराना था.1


मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वत: सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?


परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो.


आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो.


कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.”


आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;


दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा;


तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नयेस, पण त्याच दिवशी तू त्याला अवश्य पुरावेस; कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो; तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे तो देश विटाळवू नकोस.


त्या दिवशी इस्राएल लोक अतिशय दुःखी झाले; कारण शौलाने लोकांना शपथ घातली होती की, “मला आपल्या शत्रूंचा सूड घ्यायचा आहे, तर संध्याकाळपूर्वी जो कोणी अन्नाला स्पर्श करील त्याला शाप लागो;” म्हणून त्याच्या लोकांपैकी कोणीही अन्नाला शिवला नाही.


शौल म्हणाला, “परमेश्वर असेच करो, किंबहुना ह्याहून अधिक करो; योनाथान, तुला अवश्य मेले पाहिजे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan