Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 8:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

34 तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मरण पावला इतकेच नव्हे तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 तर असा कोण आहे जो आपल्याला दंडाज्ञा देईल? कोणी नाही. ख्रिस्त येशू जे मरण पावले, इतकेच नव्हे तर जिवंत असे उठविले गेले आणि तेच आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 8:34
37 Iomraidhean Croise  

तर देव त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणेल, ‘ह्याचा बचाव कर, ह्याला गर्तेत पडू देऊ नकोस; मला खंड मिळाला आहे.’


त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


कारण दरिद्र्याचा जीव दोषी ठरवणारे जे आहेत त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो.


परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही, त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही.


मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे; माझ्याबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे.


ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.


त्या दिवसांत, त्या काळी, लोक इस्राएलाचे दुष्कर्म शोधतील, पण ते नसणार; यहूदाची पातके शोधतील पण त्यांना ती सापडायची नाहीत; कारण ज्यांना मी वाचवून ठेवीन त्यांना मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो.


होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;


ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.”


ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला.


आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही पाहाल; मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.


त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्‍न विचारणार नाहीत. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल.


त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.


ह्याकरता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये; तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये.


कारण ख्रिस्त ह्यासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.


तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.


म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.]


आणि अंतर्यामे पारखणार्‍याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.


म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा.


हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि [स्वतः आमच्या] पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या ‘उजवीकडे बसला.’


ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.


खर्‍या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.


कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला;


तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan