Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणार्‍या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्‍या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले, तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या त्याच्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहत असणार्‍या त्याच पवित्र आत्म्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 8:11
37 Iomraidhean Croise  

तुझे मृत जिवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझ्यावरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहिवर आहे; भूमी प्रेते बाहेर टाकील.


मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हांला तुमच्या देशात वसवीन; तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हांला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”


जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील.


कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.


त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.


ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस ह्याला सलाम सांगा. अरिस्तबूलच्या घरातील माणसांना सलाम सांगा.


ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा;


माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा; ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते.


ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना सलाम सांगा.


ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये;


म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.]


तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगायला देहस्वभावाचे ऋणी नाही;


कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे.


परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही.


कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही;


देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील.


कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूप्रीत्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की, येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे.


हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील व तुमच्याबरोबर सादर करील.


कारण जे आम्ही ह्या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो; वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो; ह्यासाठी की, जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे.


जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.


ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे);


ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.


आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’


तुम्ही त्याच्या द्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात; त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला, ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.


कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला;


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


पुढे साडेतीन दिवसांनंतर ‘जीवनाचा आत्मा’ देवापासून येऊन ‘त्यांच्यामध्ये शिरला तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले;’ आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे ‘भय वाटले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan