Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पण आता ज्याने आपण बद्ध होतो त्याच्यासंबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत; म्हणून जुन्या शास्त्रलेखास धरून नव्हे तर आत्म्याच्या नावीन्याने आपण सेवा करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 पण आता ज्याने आपण बद्ध होतो, त्यासंबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, म्हणून जुन्या धर्मशास्त्रलेखास धरून नव्हे तर पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या नवजीवनाने आपण सेवा करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु आता ज्याने आपल्याला बांधून ठेवले होते, त्याला आपण मेलेले आहोत, म्हणून नियमशास्त्रातील जुन्या लेखाप्रमाणे नव्हे, तर एका नव्या आत्म्याच्या मार्गाने सेवा करू या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 7:6
24 Iomraidhean Croise  

मी त्यांना एकच हृदय देईन; तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहांतून पाषाणहृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन;


मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन.


तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा;


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना.


तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे; कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार ह्यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा.


कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार?


परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे.


तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.


बंधुजनहो, (नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे) मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय?


पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते; पण पती मरण पावल्यावर तिची पतिबंधनातून सुटका होते.


त्याप्रमाणे, माझ्या बंधूंनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात; अशासाठी की, तुम्ही दुसर्‍याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे.


त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो.


म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.


आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;


कारण [ख्रिस्त येशूमध्ये]सुंता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती1 हीच काय ती होय.


आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.


कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत.


आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan