Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही; म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 मी काय करतो, ते माझे मलाच कळत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर ज्याचा मला द्वेष वाटतो ते करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मी काय करतो हे मला समजत नाही. कारण जे मला करावेसे वाटते, ते मी करत नाही, जे करण्याचा मला तिटकारा येतो, तेच मी करीत असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 7:15
32 Iomraidhean Croise  

त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना जवळच्या अथवा दूरच्या देशात पाडाव करून नेले,


कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.


मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करतो; तो मला बिलगणार नाही.


तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.


मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.


ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.


मी असत्याचा द्वेष करतो व त्याचा वीट मानतो; परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.


तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो.


पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे.


स्वत:च्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर.


तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही.


दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे. तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील.


अहो परमेश्वरावर प्रीती करणार्‍यांनो, वाइटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतो. तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवतो.


नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा ह्यांना कारण होतो.


परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.


सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.


वाइटाचा द्वेष करा, बर्‍याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा; परमेश्वर, सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील.


परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे; जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो.


तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता.


मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.


प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;


तुझ्या ठायी जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष मनातल्या मनातच असू दे. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी जो स्वत:ला दोष लावत नाही तो धन्य.


जे मी इच्छीत नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो.


कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे; ही परस्परविरोधी आहेत, ह्यासाठी की, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये.


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.”


कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.


त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.


Lean sinn:

Sanasan


Sanasan