Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 6:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 परंतु आता तुम्ही पापांपासून मुक्त झाल्यामुळे तुम्ही देवाचे गुलाम आहात. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही पवित्र होता. त्याची परिणीती शाश्वत जीवनात होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 6:22
40 Iomraidhean Croise  

तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर; आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो.” हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले.


परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.”


तू आपल्या दयेने माझ्या वैर्‍यांचा नायनाट कर; माझ्या जिवाला गांजणार्‍या सर्वांचा नाश कर; कारण मी तुझा दास आहे.


माझ्या जिवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणार्‍या सेवकाचे तारण कर.


वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील;


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


मग नबुखद्नेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, “अहो शद्रख, मेशख व अबेद्नगो, परात्पर देवाचे सेवकहो, अग्नीतून बाहेर या.” तेव्हा शद्रख, मेशख व अबेद्नगो अग्नीतून बाहेर आले.


तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?”


याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची1 तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!”


तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल.


तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको.


आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला शंभरपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल;


‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’


तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे; ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे.


माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो.


कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्‍याने व कापणी करणार्‍यानेही एकत्र आनंद करावा.


तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.”


तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.


आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो.


तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे.


आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.


त्याप्रमाणे, माझ्या बंधूंनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात; अशासाठी की, तुम्ही दुसर्‍याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे.


कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे.


कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे.


प्रभू आत्मा आहे;1 आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.


मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.


बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.


आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


(कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.)


आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.


मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्या-करता2 त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी.


ख्रिस्त येशूचा दास एफफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हांला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुमच्यासाठी जीव तोडून विनंती करत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहावे.


विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत ह्याला :


सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’


बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम.


दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.


तेव्हा वडीलमंडळापैकी एकाने मला म्हटले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan