Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 ही आशा आपली फजिती होऊ देत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 5:5
35 Iomraidhean Croise  

देव अनीतिमानाचा उच्छेद करून प्राण हरण करील, तेव्हा त्याची काय आशा राहणार?


तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन; माझ्या आशेसंबंधाने मला फजीत होऊ देऊ नकोस.


राजे बापासमान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील; ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करतील. तुझ्या पायांची धूळ चाटतील; तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजीत होत नाहीत, असे तुला कळून येईल.”


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्‍या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्‍चर्य वाटले.


‘देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील, व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील;


म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.


त्या तुम्हांला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो.


परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.


त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”


जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.1


त्याने आम्हांला मुद्रांकित केले व आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा विसार दिला.


प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


तुम्ही पुत्र आहात, म्हणून देवाने “अब्बा! बापा!” अशी हाक मारणार्‍या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणांत पाठवले आहे.


आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे.


देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात.


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,


ह्या कारणाने ही दुःखे मी सोसत आहे, तरी मी लाज धरत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरवसा आहे.


पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan