Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषेकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्त्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 जर त्या एकाच माणसाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेच्या व नीतिमत्त्वाच्या दानाची विपुलता स्वीकारतात, ते कितीतरी अधिक प्रमाणात येशू ख्रिस्त या एका माणसाद्वारे जीवनात राज्य करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील!

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 5:17
26 Iomraidhean Croise  

पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”


तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”


त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले.


मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.


तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या;


चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.


एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.


परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही; कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरता विशेषेकरून विपुल झाली.


शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली.


तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.


कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.


उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.


आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू.


तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्हांला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.


आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.


आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली.


जर आपण धीराने सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू, तर तोही आपल्याला नाकारील;


माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


आणि आपल्याला ‘राज्य’ आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी ‘याजक’ असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन.


नंतर ‘मी राजासने पाहिली,’ त्यांच्यावर ‘कोणी बसले होते;’ त्यांना ‘न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता;’ आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळांवर व आपल्या हातांवर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.


पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा लोकांवर दुसर्‍या मरणाची सत्ता नाही, तर ते ‘देवाचे’ व ख्रिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.


पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’


मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan