Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि तो ‘सुंता न झालेला असताना’ त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्त्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून ‘सुंता ही खूण’ त्याला मिळाली; ह्यासाठी की, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्त्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्त्वाचा शिक्का म्हणून त्यास सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्त्व गणले जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 त्याला त्याच्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण त्याला मिळाली. म्हणून, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने पूर्वज व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 सुंता झालेली नसताना त्याच्या विश्वासामुळे नीतिमत्व प्राप्त होते याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण होती. जे विश्वास ठेवतात पण ज्यांची सुंता झाली नाही, त्या सर्वांचा अब्राहाम हा पिता झाल्यामुळे त्यांना नीतिमत्व प्राप्त व्हावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 4:11
46 Iomraidhean Croise  

अब्राहामाची सुंता झाली तेव्हा तो नव्व्याण्णव वर्षांचा होता.


राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत; अब्राहामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत; तो परमथोर आहे.


आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.


“तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे; ह्यावरून हे कळावे की, तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.


माझ्यामध्ये व इस्राएल लोकांमध्ये ही निरंतरची खूण होय; कारण परमेश्वराने सहा दिवसांत आकाश व पृथ्वी निर्माण करून सातव्या दिवशी विसावा घेतला आणि त्याचा श्रमपरिहार झाला.”


आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यांना पवित्र केले हे त्यांना समजावे.


माझे शब्बाथ पवित्र माना, म्हणजे ते तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होतील व तुम्हांला समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे.


शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.”


मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील;


येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.


ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे.


जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्रावर विश्‍वास ठेवीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.


येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.


माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.


ते त्याला म्हणाले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो; तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता?”


कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजीत होणार नाही.’


कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे.


परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व म्हणते, “तू आपल्या मनात म्हणू नकोस की, उर्ध्वलोकी कोण चढेल?” (अर्थात ख्रिस्ताला खाली आणण्यास).


हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही.


म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे.


देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवील तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे.


तो कसा गणण्यात आला? तो सुंता झालेला असताना किंवा सुंता न झालेला असताना? सुंता झालेला असताना नव्हे, तर सुंता न झालेला असताना,


तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले.


त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”


तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही.


त्याने आम्हांला मुद्रांकित केले व आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा विसार दिला.


तरी शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवले आहे; ह्यात उद्देश हा की, विश्वास ठेवणार्‍यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.


आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात.


ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, जे विश्वासाचे तेच अब्राहामाचे पुत्र आहेत.


कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत.


जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.


तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे.


देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात.


तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील.


आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.


तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.


आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून :


त्यांना असे सांगण्यात आले की, ‘पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला’ उपद्रव करू नये; तर ज्या माणसांच्या ‘कपाळांवर’ देवाचा ‘शिक्का’ नाही त्यांना मात्र उपद्रव करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan