Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 3:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कर्मांच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 तर मग फुशारकीचे काय? तिला तर मुळीच वाव नाही. कोणत्या नियमाने? कृत्यांनी काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 तर मग आमचा गर्व कशासाठी? तो वगळण्यात आला आहे. कोणत्या नियमानुसार? नियमाला कर्माची जोड हवी का? नाही, नियमाला विश्वासाची गरज आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 3:27
26 Iomraidhean Croise  

ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करावेस त्याविषयी त्या दिवसांत तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही; कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणार्‍यांना तुझ्यातून नाहीतसे करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तू ह्यापुढे तोरा मिरवणार नाहीस.


जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल.


जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्रावर विश्‍वास ठेवीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.


कारण मोशे असे लिहितो, “जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरतो तो तेणेकरून वाचेल.”


आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.]


आता जर तू स्वतःला यहूदी म्हणवत आहेस, आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस,


नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय?


आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.


म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे.


कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे; तरी देवासमोर नाही.


तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो.


तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.


आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.


कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे.


मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्‍याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा,


परंतु इस्राएल लोक नीतिमत्त्वाच्या नियमामागे लागले होते तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहचले नाहीत.


का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्यामागे लागले. ‘अडवणुकीच्या धोंड्यावर’ ते ठेचाळले;


तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?


तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’


तरी शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवले आहे; ह्यात उद्देश हा की, विश्वास ठेवणार्‍यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan