Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 आपणाला ठाऊक आहे की, प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर जबाबदार धरण्यात यावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते धर्मशास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्‍यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 3:19
24 Iomraidhean Croise  

कंगालांस आशा उत्पन्न होते, अधर्म आपले तोंड बंद करतो.


हे पाहून सरळ मनाचे लोक हर्ष पावतात; सर्व दुष्टाई आपले तोंड बंद करते. जो कोणी बुद्धिमान असेल त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, त्याने परमेश्वराची दया ओळखावी.


राजा देवाच्या ठायी हर्ष पावेल; जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील; कारण असत्य बोलणार्‍यांचे तोंड बंद होईल.


तू जे सर्व केलेस त्याची मी क्षमा करीन, म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जा पावशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.


हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती.


कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.


सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती.


कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;


कधीच नाही! देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो; शास्त्रातही लिहिलेले आहे की, “तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.”


तर मग काय? आम्ही यहूदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहूदी व हेल्लेणी हे सर्व पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे;


म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये.


कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.”


जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा.


ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा.


तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.


तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील; कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan