Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 परंतु ज्या दिवशी परमेश्वराचा यथोचित न्याय प्रकट होईल त्या क्रोधाच्या दिवसासाठी तुझ्या दुराग्रही व पश्चात्तापहीन अंतःकरणाने, तू देवाचा क्रोध साठवून ठेवतोस काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 2:5
40 Iomraidhean Croise  

तुम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे ताठ मानेचे होऊ नका, तर परमेश्वराला शरण जा आणि जे पवित्रस्थान त्याने कायमचे पवित्र केले आहे, त्याच्याजवळ या व तुमचा देव परमेश्वर ह्याची उपासना करून त्याच्या भडकलेल्या कोपाचे निवारण करा.


नबुखद्नेस्सर राजाने त्याला देवाची शपथ वाहायला लावली होती; त्याच्याविरुद्धही त्याने बंड केले; त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.


असे की अरिष्टाच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात; क्रोधाच्या दिवशी असे लोक निभावतात.


तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील;


मरीबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका;


आणि पाहा, मी स्वतः मिसर्‍यांची मने कठीण करीन. ते त्यांच्या पाठीस लागतील; आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्याकडून मी आपला सन्मान पावेन.


आता तू जा, ज्या स्थलाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. माझा दूत तुझ्यापुढे चालेल; तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्या दिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन.”


ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.


ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात.


क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते.


जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो.


पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही


सगळ्या बर्‍यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.


तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते.


परमेश्वराने ते आणले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानली नाही म्हणून हे तुमच्यावर आले.


मी त्यांना एकच हृदय देईन; तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहांतून पाषाणहृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन;


पण इस्राएल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाहीत; इस्राएलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे.


पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले.


एफ्राइमाच्या अधर्माचे गाठोडे बांधून ठेवले आहे, त्याचे पाप जमवून ठेवले आहे.


परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “हे जे आपल्या महालात बलात्कार व विध्वंस ह्यांच्या योगे धनसंचय करतात त्यांना सरळ आचरण करण्याचे ठाऊक नाही.”


वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.


बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत;


आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले,


कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो.


पण हेशबोनाचा राजा सीहोन आम्हांला त्याच्या देशातून जाऊ देईना; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला तुमच्या हाती द्यावे म्हणून त्याची वृत्ती कठोर केली व त्याचे मन कठीण केले; आज तो देश तुमच्या हाती आहे.


‘हे माझ्या संग्रही नाही काय? माझ्या भांडारात ते मोहरबंद केलेले नाही काय?


ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दु:ख सोसत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.


जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये.


शास्त्रात असे म्हटले आहे, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.”


म्हणून तो पुन्हा ‘आज’ हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका.”


तुमचे सोने व तुमचे रुपे ह्यांवर जंग चढला आहे; त्यांचा तो जंग तुमच्याविरुद्ध साक्ष होईल, आणि तो ‘अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल.’ शेवटल्या दिवसासाठी ‘तुम्ही धन साठवले आहे.’


कारण परमेश्वराचा असा हेतू होता की, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा, आणि त्यांना काहीच दयामाया न दाखवता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्राएलाशी युद्ध करायला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची मने कठीण केली.


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.


आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.


तिने पश्‍चात्ताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्‍चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही.


कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’


मिसरी लोक आणि फारो ह्यांनी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने का कठीण करता? देवाने मिसरी लोकांमध्ये अद्भुत कृत्ये केली तेव्हा इस्राएल लोकांना त्यांनी जाऊ दिले, आणि ते निघून गेले, हे खरे ना?


Lean sinn:

Sanasan


Sanasan