Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 नियमशास्त्र केवळ ऐकणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरत नाहीत, परंतु जे नियमशास्त्र पाळणारे आहेत, त्यांना नीतिमान म्हणून घोषित केले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 2:13
29 Iomraidhean Croise  

तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नकोस; कारण तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही.


परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या नगरात व यरुशलेमेच्या रस्त्यात ही सर्व वचने पुकारून सांग : ह्या कराराची वचने ऐका व त्याप्रमाणे वागा.


मी त्यांना आपले नियम लावून दिले, माझे निर्णय त्यांना दाखवून दिले; हे जो कोणी पाळील तो त्यायोगे वाचेल.


मी तुम्हांला सांगतो, त्या दुसर्‍यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”


त्याने त्यांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”


जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात.


आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो.


कारण मोशे असे लिहितो, “जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरतो तो तेणेकरून वाचेल.”


कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर सुंतेचा उपयोग आहे खरा; परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे.


म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही; कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्त्वाची प्राप्ती


कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;


देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवील तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे.


कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.


तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’


जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही कृपेला अंतरला आहात.


आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.


मोशेने सर्व इस्राएल लोकांना बोलावून सांगितले : “अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम आज मी तुम्हांला ऐकवत आहे ते ऐका; तुम्ही ते शिका आणि काळजीपूर्वक पाळा.


म्हणून, हे इस्राएला, श्रवण कर, आणि त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुझे कल्याण होईल; आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


तो न्यायसंपन्न आहे हे जर तुम्हांला माहीत आहे तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हेही तुम्हांला माहीत झाले आहे.


मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan