Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 16:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वार्थ साधू पाहतात. गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भावंडांची अंतःकरणे भुलवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची करतात. आपल्या गोड व लाघवी भाषणाने, ते भोळ्यांच्या अंतःकरणास भुरळ पाडतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 16:18
54 Iomraidhean Croise  

इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली.


इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “आम्ही रामोथ-गिलादावर चढाई करून जावे की न जावे?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जावे; देव ते राजाच्या हाती देईल.”


तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.


ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,


परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.


भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.


चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.


अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा.


मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’


ज्या संदेष्ट्यांनी यरुशलेमेविषयी संदेश दिला व शांती नसता शांती आहे असा दृष्टान्त सांगितला ते तुम्ही नष्ट झाला आहात, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


लबाडीस कान देणार्‍या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.


ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडीबहुत मदत होईल; पण पुष्कळ लोक त्यांच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील.


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे! तुमच्यात मला मुळीच संतोष नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; तुमच्या हातचे यज्ञार्पण मी मान्य करून घेणार नाही.


पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.


जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.


कारण ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे.


तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही; तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकाला आपणांस पटवतो.


मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.


कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात;


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


लाघवी भाषणाने कोणी तुम्हांला भुलवू नये म्हणून हे सांगतो; कारण जरी मी देहाने दूर आहे,


प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा.


मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणार्‍या माणसांची एकसारखी भांडणे होतात; [त्यांच्यापासून दूर राहा.]


बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम.


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून :


ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक1 असे आहेत; ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात; ते वार्‍याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत;


ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत; तोंडाने ते फुशारकी मारतात; व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.


येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण : हे त्याला देवाकडून झाले. ‘ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या’ आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झाले; आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले.


माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?


Lean sinn:

Sanasan


Sanasan