Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5-6 आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आता, जो धीर व उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देवो की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 धीर व उत्तेजन देणारा देव ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे म्हणून तुम्हांला सक्षम करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 धीर व प्रोत्साहन देणारा परमेश्वर तुम्हाला एकमेकांबरोबर एकचित्ताने राहण्यास साहाय्य करो. प्रत्येकाने एकमेकांशी ख्रिस्त येशूंच्या ठायी असलेल्या वृत्तीने व विचाराने वागावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 15:5
23 Iomraidhean Croise  

आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.


हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.


परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली : “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,


त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांचे हित व्हावे म्हणून त्यांनी सर्वदा माझे भय बाळगावे ह्यासाठी मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.


मी त्यांना एकच हृदय देईन; तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहांतून पाषाणहृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन;


तेव्हा विश्वास धरणार्‍यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते.


परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.


आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.


कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही; तर “तुझी निंदा करणार्‍यांनी केलेली निंदा माझ्यावर आली,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.


बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो; तुम्हांला पूर्णता लाभो; समाधान मिळो; तुम्ही एकचित्त व्हा; शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.


तथापि दीनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले;


आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;


तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.


तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे.


मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा.


हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसांत तारू तयार होत असता देव सहन करत वाट पाहत होता त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचवण्यात आले.


शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदु:खी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा.


आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे;


कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan