Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 15:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18-19 ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे शब्दाने आणि कृतीने काही सांगायला मी धजणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18-19 यहुदीतरांनी आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या साहाय्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले, ते ते तुम्हांला सांगण्याचे धाडस मी करतो. अशा प्रकारे यरुशलेमपासून इल्लूरिकमपर्यंत मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान पूर्णपणे घोषित केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 गैरयहूदीयांनी परमेश्वराचे आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्द व कृतीने जे काही पूर्ण केले त्या व्यतिरिक्त मी इतर गोष्टीबद्दल बोलण्यास धजणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 15:18
28 Iomraidhean Croise  

मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरवणारा आहे.


ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले.


त्यानंतर त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणार्‍या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता.]


तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.


तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.


नंतर ते यरुशलेमेस पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना देवाने जे जे केले ते त्यांनी सांगितले.


तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.


तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.


त्याच्या द्वारे आम्हांला कृपा व प्रेषितपद मिळाले; अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले,


आपल्या प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही.


कारण मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही; मी खरे तेच बोलेन; तथापि मी बोलत नाही; कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये.


आम्ही स्वत: कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे;


आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;


(कारण ज्याने पेत्राला सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयांत तो चालवण्यास शक्ती पुरवली),


आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.


तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हांला स्थिर करो.


अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’


आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्‍या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला,


वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.


मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.


आद्य देवदूत मीखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही; तर “प्रभू तुला धमकावो” एवढेच तो म्हणाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan