Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 15:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्‍या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 15:13
21 Iomraidhean Croise  

तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल; पर्वत व टेकड्या तुमच्यापुढे जयघोष करतील; वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.


हे इस्राएलाच्या आशाकंदा, संकटसमयीच्या त्यांच्या त्रात्या, देशातल्या उपर्‍यासारखा, रात्रीच्या उतारूसारखा तू का झालास?


परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.


“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.


मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.


आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा;


कारण खाणे व पिणे ह्यांत देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यांत ते आहे.


आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.


तुमचा विश्वास मनुयांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणार्‍या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.


सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.


आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळवण्यात आली; तसेच तुमच्याकरता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हांला ठाऊक आहे.


देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला,


आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी;


त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.


ती म्हणाली, “ह्या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी होवो.” मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले, व त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan