Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 दुसर्‍याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्‍न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल; कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 दुसर्‍याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो यशस्वी होतो किंवा अयशस्वी ठरतो हा त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर यशस्वी करण्यात येईल कारण त्याला यशस्वी करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 दुसर्‍याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 14:4
19 Iomraidhean Croise  

माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत.


दुर्जनांचे बाहू मोडतील, पण नीतिमानांचा आधार परमेश्वर आहे.


तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील.


कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.


तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो.


जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले; तर मग देवाला अडवणारा असा मी कोण?”


आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे.


जो खातो त्याने न खाणार्‍याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणार्‍याला दोष लावू नये; कारण देवाने त्याला जवळ केले आहे.


आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हांला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.


हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणार्‍याला, “तू मला असे का केलेस,” असे म्हणेल काय?


ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.


तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan