Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा आदर राखायचा त्याचा आदर राखा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 13:7
23 Iomraidhean Croise  

त्यांतली एक स्त्री म्हणाली, “माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो. हिच्याबरोबर राहत असता मी प्रसूत होऊन मला मूल झाले.


आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.


माझ्या मुला, परमेश्वराचे व राजाचे भय बाळग. जे चंचल वृत्तीचे आहेत त्यांच्यात मिसळू नकोस;


एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नकोस.


तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बाथ पाळावेत, मी परमेश्वर तुमचा देव आहे.


पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.


त्याने म्हटले, “हो, देतो.” मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून?”


ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.”


येशू त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्‍चर्य वाटले.


आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”


तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.”


आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.”


बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.


ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात.


तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.


दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा;


शिवाय घरोघर फिरून त्या आळशी होतात; आणि आळशी होतात इतकेच नव्हे, तर वटवट्या व लुडबुड्या होतात, आणि बोलू नये ते बोलतात.


जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतींत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावेत.


जे दास म्हणून जोखडाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे; ह्यासाठी की देवाच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये;


पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.


मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली, आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली; तेव्हा सर्व लोकांना परमेश्वराची व शमुवेलाची दहशत बसली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan