Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 म्हणूनच तर तुम्ही करही देता कारण जेव्हा अधिकारी सेवेत तत्पर असतात, तेव्हा ते देवाची सेवा करीत असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याकारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 13:6
18 Iomraidhean Croise  

आणि दिमिष्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हददेजर ह्याची कुमक करायला आले तेव्हा दाविदाने त्यांतल्या बावीस हजार लोकांचा संहार केला.


दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व नीतीने वागे.


महाराजांस हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी, कर व जकात द्यायचे नाहीत; एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल.


ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्‍चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत.


ह्याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूद्यांच्या वडील जनांशी तुमचे काय कर्तव्य आहे ह्याविषयी मी तुम्हांला अशी आज्ञा करतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदाच्या पश्‍चिम प्रांतांच्या करामधून ह्या लोकांना खर्च ताबडतोब पुरवावा; त्यांना काही अडथळा करू नये.


दुसरे कित्येक म्हणू लागले की, “राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षांच्या मळ्यांवर आम्ही पैसा काढला आहे.


आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.”


बोध करणार्‍याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्‍याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्‍याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्‍याने ती संतोषाने करावी.


म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे.


ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan