Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग; कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही; तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणार्‍याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तलवार धरीत नाही कारण तो वाईट करणार्‍यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो अधिकार व्यर्थ धारण करत नाही तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाऱ्यांना शिक्षा करणारा असा तो देवाचा सेवक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण तुमचे हित करण्यासाठी तो परमेश्वराचा नेमलेला सेवक आहे. परंतु तुम्ही अयोग्य केले, तर त्याची भीती बाळगा, कारण तो तलवार व्यर्थ धारण करीत नाही. अयोग्य करणार्‍याला शासन करण्यासाठी तो परमेश्वराचा सेवक, न्यायनीतीचा कारभारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 13:4
23 Iomraidhean Croise  

ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”


त्याने शास्त्यांना सांगितले, “तुम्ही काय करता ह्याचा विचार करा; तुम्ही न्याय कराल तो मानवासाठी नाही तर परमेश्वरासाठी करायचा आहे; न्याय करताना तो तुमच्याबरोबर असणार.


राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो.


राजाचा दरारा सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, त्याला जो राग आणतो तो आपल्या जिवाविरुद्ध पाप करतो.


सुज्ञ राजा दुर्जनांना पाखडून टाकतो, त्यांच्यावर चाक फिरवून त्यांची मळणी करतो.


राजा न्यायासनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो.


चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या.


ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत, ते दुष्कर्माची कमाल करतात; आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालांस न्याय देत नाहीत.


तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्‍या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात.


मी आपले लोक इस्राएल ह्यांच्या हातून अदोमाचा सूड घेईन; माझ्या आवेशयुक्त क्रोधानुसार ते अदोमाची वाट लावतील; त्यांना माझ्या सुडाचा अनुभव येईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका.


प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.


ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात.


कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.


रक्तपाताचा सूड उगवणार्‍याने त्याचा पाठलाग केला तर त्यांनी त्या मनुष्यवध करणार्‍याला त्याच्या हाती देऊ नये; कारण त्याने नकळत आपल्या शेजार्‍याचा वध केला आहे; त्याचे त्याच्याशी पूर्वीचे वैर नव्हते.


सर्व इस्राएल लोकांसाठी व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्‍या उपर्‍या लोकांसाठी ही नगरे नेमलेली होती. कोणी एखाद्यास नकळत जिवे मारले व तो अशा एखाद्या नगरात पळून गेला, तर त्याला तेथील मंडळीसमोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेणार्‍याकडून त्याची हत्या होऊ नये.


आणि अधिकारी हे वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan