Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत किंवा अमंगळपणात व कामातुरपणात किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 दिवसाढवळ्या उचित ठरेल अशा शिष्टाचाराने आपण चालावे. चैनबाजी व मद्यपान, विषयविलास व कामासक्ती, कलह व मत्सर ही टाळावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 13:13
42 Iomraidhean Croise  

मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्‍यास उभा राहू नकोस;


ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


तुम्हांला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे;


कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही?


देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही : जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा,


हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला;


म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;


म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.


द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा;


कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;


तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्या-करता2 त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी.


तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा;


जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हांला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.


निरंतर प्रार्थना करा;


“जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते” हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय?


मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्‍याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे.


आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला.


त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.


Lean sinn:

Sanasan


Sanasan