Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 देवाची इच्छा काय आहे म्हणजेच त्याच्या दृष्टीने चांगले, ग्रहणीय व परिपूर्ण काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 12:2
61 Iomraidhean Croise  

तर आता आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर आपले पाप कबूल करा, त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करा आणि ह्या देशाचे लोक व अन्य जातींच्या स्त्रिया ह्यांच्यापासून निराळे व्हा.”


तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.


ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.


हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.


सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.


अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.


परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!


हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.


दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणार्‍या बहुजन-समाजास अनुसरू नकोस आणि बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नकोस,


तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या; आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा; हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता?


मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन.


काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.


व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.


ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही;


तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते.


मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.


जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.


तरीपण नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे.


कारण आपल्याला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे; मी तर दैहिक, पापाला विकलेला असा आहे.


माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो;


कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे; कारण “तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो,” असा शास्त्रलेख आहे.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.


म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.


आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.


म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्‍चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी,


त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.


म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.


ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्या द्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे;


आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.


ख्रिस्त येशूचा दास एफफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हांला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुमच्यासाठी जीव तोडून विनंती करत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहावे.


कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे.


तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


अहो अविश्वासू लोकांनो,1 जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.


तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका;


कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे,


ह्यासाठी की, तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.


त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.


प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले, तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे.


बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्‍चर्य मानू नका.


आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.


मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.


‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकर्‍याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan