Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 12:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीच्या लोकांच्या सहवासात रहा. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचा दावा करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना, अहंकार बाळगू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 12:16
48 Iomraidhean Croise  

आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.


पाहा, देव समर्थ आहे तरी तो कोणाला तुच्छ मानत नाही; त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे.


जो गरिबाची कुचेष्टा करतो तो त्याला उत्पन्न करणार्‍याचा अवमान करतो; जो दुसर्‍याच्या विपत्तीमुळे आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही;


जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.


मनुष्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते; लबाडापेक्षा दरिद्री बरा.


दरिद्र्याचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करतात; मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात ह्यात नवल ते काय? त्यांनी आपल्याशी बोलावे म्हणून तो त्यांच्या मागून जातो, परंतु ते निघून जातात.


आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा माणसापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे.


मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वत:ला शहाणा समजेल.


तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.


जे आपल्या दृष्टीने ज्ञानी व आपल्या मते समंजस त्यांना धिक्कार असो.


त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांचे हित व्हावे म्हणून त्यांनी सर्वदा माझे भय बाळगावे ह्यासाठी मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.


तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करतोस काय? ती करू नकोस, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो; पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.”


‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’;


कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही.


तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा;


तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे.


तेव्हा विश्वास धरणार्‍यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते.


बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग;


बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत;


कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.


आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.


कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार?


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.


कोणी स्वत:ला फसवून घेऊ नये; ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे.


आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे; आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त; तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत.


तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुमच्यामध्ये नाही, असे आहे की काय?


जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही.


बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो; तुम्हांला पूर्णता लाभो; समाधान मिळो; तुम्ही एकचित्त व्हा; शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;


तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे.


मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा.


तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”


शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदु:खी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा.


तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा;


मी मंडळीला थोडेसे लिहिले; परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan