Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 बंधुजनहो, मी देवाच्या महान करुणेमुळे तुम्हांला आवाहन करतो की, तुम्ही आपली शरीरे सजीव, पवित्र व ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावीत, ही खरी उपासना आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यास्तव, बंधू आणि भगिनींनो, मी परमेश्वराच्या दयेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला संतोष होईल असा यज्ञ करावा; हीच तुमची खरी आणि योग्य उपासना ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 12:1
49 Iomraidhean Croise  

परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?


हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.


त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.


होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;


ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.”


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


ती कृपा अशी की, मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे; अशासाठी की, परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे.


बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा;


किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा.


आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे; कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार ह्यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा.


आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले, तर काय?


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.


मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो, तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो;


म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही.


म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.


म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.


आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;


म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला;


प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा.


कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रांतून आपली खास प्रजा म्हणून तुम्हांला निवडून घेतले आहे.


तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;


मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे.


बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे1 हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात; त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी.


आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी,


बंधुजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा;


हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे.


कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधार्‍या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.


मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो;


तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान,


बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.


कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan