Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 “आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये असे कान दिले,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 धर्मशास्त्रलेखात म्हटल्याप्रमाणे: देवाने त्यांचे मन आणि अंतःकरण संवेदनशून्य केले. आजही ते ऐकू वा पाहू शकत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जसे लिहिले आहे: “परमेश्वराने त्यांना धुंदीचा आत्मा दिला आहे, त्यांचे डोळे पाहू शकत नाहीत व कान ऐकू शकत नाहीत, आणि असे आज या दिवसापर्यंत चालले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 11:8
13 Iomraidhean Croise  

ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर चालत आहेत; ते परमेश्वराचे भय बाळगत नाहीत; ते आपले स्वतःचे नियम व निर्णय पाळत नाहीत किंवा परमेश्वराने ज्यांना इस्राएल हे नाव दिले त्या याकोबाच्या वंशजांना परमेश्वराने विहित केलेले नियमशास्त्र व आज्ञा ह्यांप्रमाणेही चालत नाहीत.


ह्या प्रकारे ही राष्ट्रे इकडे परमेश्वराचे भय धरत व तिकडे कोरीव मूर्तींचीही पूजा करत; त्यांचे पूर्वज करत त्याप्रमाणेच त्यांचे पुत्रपौत्र आजवर करत आहेत.


परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत, संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे.


तो म्हणाला, “जा, ह्या लोकांना सांग की : ‘ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा, पण जाणू नका.’


“मूर्ख, बुद्धिहीन लोकहो, हे आता ऐका; तुम्हांला डोळे असून दिसत नाही. तुम्हांला कान असून ऐकू येत नाही.


“मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही; कारण ते फितुरी घराण्यातले आहेत.


मी त्यांची नासधूस केल्याने त्यांना असे समजावे की मी परमेश्वर आहे; मी त्यांना त्यांच्या यज्ञार्पणासंबंधाने असे भ्रष्ट केले की त्यांनी गर्भाशयातून प्रथम निघालेल्यांचा अग्नीत होम केला.


तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे; परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत; अशासाठी की, ‘त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.’


‘ह्या लोकांकडे जाऊन सांग की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही; व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणार नाही;


पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हांला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिले नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan