Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ‘त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.’ एलीयाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलीयाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ज्यांची त्याने सुरुवातीपासून निवड केली, त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत धर्मशास्त्र काय म्हणते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते अशा आपल्या लोकांचा परमेश्वराने त्याग केला नाही. वचनामध्ये एका भागात एलीयाहबद्दल म्हटले, ते तुम्हाला माहीत नाही का—इस्राएलविरुद्ध परमेश्वराजवळ त्याने कशी विनंती केली:

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 11:2
24 Iomraidhean Croise  

योसेफ त्यांना म्हणाला, “हे कसले कृत्य तुम्ही केले? माझ्यासारख्या माणसाला शकुन पाहता येतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?”


तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केलीस व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यांना बजावत आलास; पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यांना अनेक देशांतील लोकांच्या हाती दिलेस.


कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; तो आपले वतन सोडून देणार नाही.


मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, “ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.”


परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वांमुळे मी त्या सगळ्या वंशांचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा मोशेचा कोप भडकला. तो परमेश्वराला म्हणाला, “त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस; मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही.”


पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे?’


येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले;


ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून?


हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला.


हे जे त्याला युगादिपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.’


बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकार्‍यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे.


ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे; कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.’


आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले, तर काय?


तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही.


किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हायचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय?


जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.1


पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.


देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.


देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून : तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळोत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan