Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 11:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 अस्सल अशा ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू जंगली ऑलिव्ह झाडाच्या फांदीसारखा असता त्यांच्या जागी कलमरूपे जर लावला गेलास व अस्सल अशा कसदार ऑलिव्ह वृक्षाच्या मुळाचा भागीदार झालास,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जर काही फांद्या मोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही, जे रानटी जैतून, त्यांच्यामध्ये कलमरूपे लावले तर तुम्ही जैतून वृक्षाच्या मुळातून होणार्‍या पौष्टिकतेचे वाटेकरी झाला आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 11:17
22 Iomraidhean Croise  

मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


परमेश्वराने तुला ‘चांगल्या फळांनी शोभिवंत असलेले हिरवे जैतून झाड’ हे नाव दिले, पण मोठी गर्जना करून त्याने त्याला आग लावली व त्याच्या फांद्या मोडल्या.


त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला; त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले.


आणि त्याच्याजवळ कटोर्‍याच्या उजव्या व डाव्या बाजूंना दोन जैतुनाची झाडे आहेत.”


म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.


मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.


माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो.


कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.


कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.”


जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेषेकरून लावण्यात येईल?


आम्ही जन्मतः यहूदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयांतले नाही;


ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.


गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्यांचा तो देश आहे; तो जैतुनवृक्षांचा आणि मधाचा देश आहे.


जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;


‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे’ व ‘दोन समया’ ही ते आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan