Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ‘ईर्ष्या निर्माण होण्यासाठी’ त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग मी विचारतो की, इस्राएलाने पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परराष्ट्रीयांकडे आले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 तर मी विचारतो, यहुदी लोकांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? मुळीच नाही! तर त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधामुळे यहुदीतरांचे तारण झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी पुन्हा विचारतो: ते असे अडखळले की परत उभे राहू शकणार नाहीत का? नक्कीच नाही! त्यांच्या पापांमुळे, गैरयहूदी लोकांना तारण प्राप्त होईल, म्हणजे इस्राएल ईर्षेला पेटतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 11:11
14 Iomraidhean Croise  

प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे ह्याने मला संतोष होतो ना?


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणार्‍याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही; तर मागे फिरा व जिवंत राहा.


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


तो येऊन त्या मळेकर्‍यांचा नाश करील व द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल.” हे ऐकून ते म्हणाले, “असे न होवो.”


ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की, आम्हांला पुढल्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगाव्यात.


परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर; मी निर्दोष आहे; आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार.”


आणखी मी विचारतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, “जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हांला ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे मी तुम्हांला चीड आणीन.”


तर मी विचारतो, ‘देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?’ कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे.


आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा र्‍हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल!


ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे.


त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan