Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 10:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, “आज्ञा मोडणार्‍या व उलटून बोलणार्‍या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्‍या आणि उलटून बोलणार्‍या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 पण इस्राएलविषयी तो म्हणतो: आज्ञा मोडणाऱ्या व विरोध करणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यासाठी मी सारा दिवस माझे हात पुढे केले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 इस्राएलाबद्दल तो म्हणतो, “आज्ञा न पाळणार्‍या आणि हट्टी लोकांसाठी मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 10:21
19 Iomraidhean Croise  

पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुद्ध बंड केले; तुझे नियमशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले; तुझ्याकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले आणि तुला संतप्त केले.


मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;


परमेश्वर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आला, मोठ्या निकडीने पाठवत आला, तरी तुम्ही ऐकले नाही, आपला कान लावला नाही.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी यहूदा व सर्व यरुशलेमकर ह्यांच्यावर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन; कारण मी त्यांच्याबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही, मी त्यांना हाक मारली असता त्यांनी उत्तर दिले नाही.”


आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.


कारण तुमचा बंडखोरपणा आणि तुमच्या मानेचा ताठा मी जाणून आहे; पाहा, मी अजून तुमच्याबरोबर जिवंत असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करीत आला आहात, तर मी मेल्यावर कितीतरी कराल!


परमेश्वर आणखी मला म्हणाला, ‘मी ह्या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत.


परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे. त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे.


आणि “ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला;” ते वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan