Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बंधुजनहो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की, त्यांचे तारण व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 बंधुजनहो, माझ्या इस्राएली लोकांचे तारण व्हावे ही माझी मनीषा व देवाजवळ विनंती आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बंधूंनो व भगिनींनो, माझी मनापासून इच्छा व परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की इस्राएल लोकांचे तारण व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 10:1
14 Iomraidhean Croise  

तर आता मला आड येऊ नकोस; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.”


तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्‍यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’


मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतली नाही आणि मी संकटाच्या दिवसाची अपेक्षाही केली नाही हे तुला ठाऊक आहे; जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर होते.


बर्‍याची फेड वाइटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जिवासाठी खाडा खणला आहे. त्यांच्यावरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो ह्याचे स्मरण कर.


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


पण मी माणसांची साक्ष मान्य करत नाही; तथापि तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो.


मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.


त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”


तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो; मी तुम्हांला चांगला व सरळ मार्ग दाखवतो.


“मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे; कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” ह्यावरून शमुवेलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला.


शमुवेल मरेपर्यंत पुन: शौलाच्या भेटीला गेला नाही; तरी शमुवेल शौलासाठी विलाप करीत असे; आणि आपण शौलाला इस्राएलावर राजा केले ह्याचा परमेश्वराला अनुताप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan