Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 1:21
34 Iomraidhean Croise  

पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले;


परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही.


अरामाच्या राजाचे सेवक त्याला म्हणाले, “त्यांचे देव पहाडी देव आहेत; म्हणूनच ते आमच्यावर प्रबळ झाले; तर आता सपाटीवर आपण त्यांच्याशी युद्ध करू म्हणजे आपण खातरीने त्यांच्यावर प्रबळ होऊ.


आणि त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यांना पढवलेले त्याचे निर्बंध ह्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्रांप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यांना बजावले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले.


जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो; आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.”


ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले; ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले.


हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील.


पाहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.


पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?


परमेश्वर म्हणतो की, “तुमच्या पूर्वजांना माझ्या ठायी असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले?


तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते बआलमूर्तींच्या मागे लागले.


येणेकरून मी इस्राएल घराण्याच्या हृदयास हात घालीन, कारण ते सर्व आपल्या मूर्तींमुळे मला परके झाले आहेत.


तेव्हा जे चांगले नाहीत असे नियम मी त्यांना दिले, ज्यांनी ते जगायचे नाहीत असे निर्णय त्यांना दिले.


तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.


निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव.”


आंधळा जसा चाचपडतो तसा तू भरदुपारी चाचपडत फिरशील; तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल; पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही.


कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र,


कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे,


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan