Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 बंधूंनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 बंधुजनहो, इतर यहुदीतरांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली, तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आत्तापर्यंत मला अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 बंधूंनो व भगिनींनो, इतर गैरयहूदीयांमध्ये मला जशी पीकप्राप्ती झाली, तशी तुम्हामध्येही व्हावी म्हणून मी तुमच्याकडे येण्याचा अनेकदा निश्चय केला, पण आतापर्यंत मला प्रतिबंध करण्यात आला, हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 1:13
38 Iomraidhean Croise  

येणार्‍या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.


तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे; ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे.


कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्‍याने व कापणी करणार्‍यानेही एकत्र आनंद करावा.


त्या दिवसांत पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये) उभा राहून म्हणाला,


तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.


तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.


हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्‍चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.”


तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.


तेथे आम्हांला बंधुजन भेटले; त्यांनी आपल्या येथे सात दिवस राहण्याची आम्हांला विनंती केली; अशा रीतीने आम्ही रोम शहरास आलो.


म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुमच्याविषयी व तुम्हांला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.


बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत;


बंधुजनहो, (नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे) मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय?


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.


बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले;


बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.


बंधुजनहो, तर मग काय? तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो; सर्वकाही उन्नतीसाठी असावे.


जरी मी दुसर्‍यांना प्रेषित नसलो तरी निदान तुम्हांला तरी आहे; कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही शिक्का आहात.


बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हांला झाले.


जो देव आम्हांला सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो, आणि सर्व ठिकाणी आमच्या द्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रकट करतो, त्याची स्तुती असो.


बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो; माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही.


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.


पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.


मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्या-करता2 त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी.


ही सुवार्ता तुमच्याकडे येऊन पोहचली आहे; तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली, त्या दिवसापासून जशी तुमच्यामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत व वृद्धिंगत होत चालली आहे.


ह्यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याचे इच्छिले; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले; परंतु सैतानाने आम्हांला अडवले.


बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.


कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील.


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan