Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुमच्याविषयी व तुम्हांला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 म्हणजे मी, तुमच्या व माझ्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांना, मला तुमच्यांकडून व तुम्हांला माझ्याकडून उत्तेजन प्राप्त व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तर एकमेकांच्या विश्वासाकडून मला व तुम्हालाही उत्तेजन मिळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 1:12
17 Iomraidhean Croise  

तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.’


तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे;


बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


म्हणून मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन (कारण तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोळवण कराल अशी मी आशा धरतो.)


अशी की, मी देवाच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्याबरोबर विश्रांती घ्यावी.


ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे; आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे, तर विशेषेकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.


प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच,


देवपित्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा ह्याच्यापासून कृपा, दया व शांती असो.


आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून :


आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला.


प्रियजनहो, आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हांला लिहायची मला मोठी ओढ लागली होती, तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हांला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan