Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्यांना उरस्त्राणे होती ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती; आणि त्यांच्या पंखांचा आवाज ‘लढाईत धावणार्‍या’ अनेक घोड्यांच्या ‘रथांच्या आवाजासारखा’ होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 त्यांची उरस्त्राणे लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती. त्यांच्या पंखांचा आवाज युद्धातील अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांनी लोखंडी ऊरस्त्राणासारखी ऊरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 9:9
8 Iomraidhean Croise  

रणशिंग जेव्हाजेव्हा वाजते तेव्हा तो ‘अहा!’ म्हणतो; लढाई, सरदारांची गर्जना व रणशब्द ह्यांचा वास तो दुरून काढतो.


त्याची हाडे जणू काय पितळेच्या नळ्या, त्याच्या फासळ्या जणू काय लोखंडाचे गज.


युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.


त्याच्या घोड्यांच्या खुरांच्या टापामुळे, त्याच्या रथांच्या नादामुळे व त्याच्या चाकांच्या घडघडाटाने वडिलांचे हात गळाल्यामुळे ते मागे वळून आपल्या मुलांकडेसुद्धा पाहायचे नाहीत.


त्या दृष्टान्तात घोडे व त्यांच्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे : त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती; आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan