Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्या टोळांचे ‘स्वरूप लढाईसाठी’ सज्ज केलेल्या ‘घोड्यांसारखे’ होते; त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी दिसत होते. त्यांचे तोंडवळे माणसांसारखे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 त्या टोळांचे रूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखे काही तरी दिसत होते. त्यांचे चेहरे माणसांसारखे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 9:7
6 Iomraidhean Croise  

पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले.


मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.


तुझे सरदार झुंडींनी येणार्‍या टोळांसारखे आहेत, तुझे सेनापती टोळांच्या झुंडीसारखे आहेत; ते थंडीच्या दिवसांत कुंपणात तळ देतात व सूर्योदय होताच पळून जातात; ते कोठे गेले ते कोणास कळत नाही.


मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला.


त्या धुरातून ‘टोळ निघून पृथ्वीवर’ उतरले; त्यांना पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ती देण्यात आली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan