Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 9:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी ‘आपल्या हातच्या कृत्यांविषयी’ पश्‍चात्ताप केला नाही; म्हणजे, ‘भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची’ पूजा करणे त्यांनी सोडले नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या दैवतांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडविलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, कास्याच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 9:20
43 Iomraidhean Croise  

कारण ह्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे, म्हणून ह्या स्थानावर माझा क्रोध भडकेल, तो शांत व्हायचा नाही.


संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.


कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही.


त्यांनी आपले पुत्र व कन्या ह्यांचे बळी भुतांना दिले;


त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.


ओतार्‍याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्‍याने ऐरणीवर घण मारणार्‍याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली.


त्यांनी मला सोडले आहे, अन्य देवांपुढे धूप जाळला आहे व आपल्या हातच्या कृतींची पूजा केली आहे; त्यांच्या ह्या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यांना शिक्षा फर्मावीन.


अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांचे भजनपूजन करण्यास त्यांच्यामागे जाऊ नका, म्हणजे तुम्ही आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणणार नाही व मी तुमचे वाईट करणार नाही.’


कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात त्यात अन्य देवांना धूप जाळल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांत शापास व अप्रतिष्ठेस पात्र व्हाल.


हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; त्याने ओतलेली मूर्ती प्रत्यक्ष लबाडीच आहे; त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.


आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या (बोकड) मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशू अर्पण करू नयेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


तुझ्या कोरीव मूर्तींचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करीन, तू ह्यापुढे आपल्या हातांच्या कृतींच्या पाया पडणार नाहीस.


कारण योहान नीतीच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; जकातदार व कसबिणी ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हांला पस्तावा झाला नाही.


तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.


तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.


मग त्या दिवसांत ‘त्यांनी वासराची मूर्ती बनवली’ व तिच्यापुढे ‘यज्ञ करून’ आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला.


मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील; आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल.


कारण मला ठाऊक आहे की, मी मेल्यावर तुम्ही अगदी बिघडून जाल; ज्या मार्गाने चालण्याची मी तुम्हांला आज्ञा केली आहे तो तुम्ही सोडून द्याल; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते तुम्ही कराल व आपल्या हातच्या कृतीने त्याला चीड आणाल म्हणून पुढील काळी तुमच्यावर विपत्ती येऊन पडेल.”


देव नाहीत अशा भुतांना, जे अलीकडेच नवीन निघाले आहेत, ज्यांना तुमचे पूर्वज भीत नव्हते, अशा अपरिचित देवांना त्यांनी बली अर्पण केले.


तेथे तुम्ही मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठ-पाषाणादिकांचे देव, जे पाहत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत व हुंगत नाहीत अशांची सेवा कराल.


आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील;


नंतर मी अत्यंत आश्‍चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले; त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.


चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली.


कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे; त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांनाही डोकी आहेत, आणि त्यांनी ते उपद्रव करतात.


आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, ‘चेटके, जारकर्म व चोर्‍या’ ह्यांबद्दलही पश्‍चात्ताप केला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan