Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने अथांग डोह उघडला, ‘तेव्हा’ त्यातून मोठ्या ‘भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला;’ आणि त्या डोहातल्या धुराने ‘सूर्य’ व अंतराळ हे ‘अंधकारमय’ झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने अगाधकूप उघडला, तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला; आणि कूपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 त्या ताऱ्याने अथांग विवर उघडला, तेव्हा त्यातून अवाढव्य भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या विवरातल्या धुराने सूर्य व अंतराळही अंधकारमय झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 9:2
16 Iomraidhean Croise  

नंतर सूर्य मावळला आणि निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली.


त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश ह्यांच्याकडे नजर फेकली तर पाहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता!


सर्व सीनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला.


अगे वेशी, हायहाय कर; अगे नगरी, ओरड; हे पलेशेथा, तू सर्वस्वी वितळून जाशील; कारण उत्तरेकडून धूर येत आहे; त्याच्या सैन्यापैकी कोणी चुकून मागे राहणार नाही.”


जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील.”


त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात.


अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे; पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही.


मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन.


‘आणि’ वर ‘आकाशात अद्भुते, व’ खाली ‘पृथ्वीवर’ चिन्हे, ‘म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन;


त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो;’ आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना, आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्याला ‘रात्रंदिवस’ विश्रांती मिळत नाही.”


पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या;


चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्‍यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.


पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली.


अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे; इब्री भाषेतील त्यांचे नाव अबद्दोन, आणि हेल्लेणी भाषेतील त्याचे नाव अपल्लूओन आहे.


त्या दृष्टान्तात घोडे व त्यांच्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे : त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती; आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan