Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 त्या दृष्टान्तात घोडे व त्यांच्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे : त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती; आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे; त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्राणे होती आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 त्या दृष्टान्तात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक हे सारे निघत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्या दृष्टान्तात घोडे व स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नीसारखी लाल, गडद निळ्या रंगाची व गंधकासारखी पिवळ्या रंगांची ऊरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडामधून अग्नी, धूर व गंधक हे सर्व निघत होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 9:17
16 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला;


दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे :


दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


तो पळून आलेला मनुष्य येऊन पोहचला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला होता; तो मनुष्य सकाळी माझ्याकडे येण्यापूर्वी देवाने माझे तोंड उघडले होते; माझे तोंड उघडल्यावर मी काही मुका नव्हतो.


मी दृष्टान्तात पाहिले तर मला असे दिसून आले की मी एलाम परगण्यातल्या शूशन राजवाड्यात आहे; आणखी मी दृष्टान्तात पाहिले तेव्हा मी उलई नदीतीरी आहे.


असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गब्रीएल, दृष्टान्ताच्या आरंभी मी अगदी व्याकूळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.


त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास ‘त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैर्‍यांना खाऊन टाकतो;’ कोणी त्यांना उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जिवे मारण्यात यावे.


तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


त्यांना ठकवणार्‍या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.


पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पद्मराग अशा रत्नांचे ते होते.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


त्यांच्या तोंडांतून निघणार्‍या अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे जिवे मारली गेली.


त्यांना उरस्त्राणे होती ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती; आणि त्यांच्या पंखांचा आवाज ‘लढाईत धावणार्‍या’ अनेक घोड्यांच्या ‘रथांच्या आवाजासारखा’ होता;


Lean sinn:

Sanasan


Sanasan